ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
शेनवड खुर्द हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तहसीलमध्ये वसलेले एक गाव आहे . ते उपजिल्हा मुख्यालय इगतपुरी (तहसीलदार कार्यालय) पासून १७ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय नाशिक पासून २८ किमी अंतरावर आहे. २००९ च्या आकडेवारीनुसार, शेनवड खुर्द गावाचे ग्रामपंचायत आहे.
योजनाच्या पूर्वीची परिस्थिती व सध्याची परिस्थिती
शेनवड खुर्द गावात सन १९८० पूर्वी झिरे, व खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. त्यानंतर गावामध्ये दोन ग्रामपंचायत विहिर खोदण्यात आल्या आहेत त्यामधून पाणी हे गावातील व्यक्ती तसेच महिला पाण्याचा उपयोग करतात. सन २०२१-२२ जिल्हा परिषदेकडून जलजीवन मार्फत दारणा धरण येथून पाण्याची लाईन करण्यात आली व ती नियमित पणे सुरु आहे. जलजीवन योजने अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळ जोडणी आहे. गावासाठी जलजीवन पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ६०००० लिटर क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली. गावांना वैयक्तिक नळ योजना या मधून देण्यात आली. आज रोजी पाणीपुरवठा सुरळीत होत आहे.
२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार शेनवड खुर्द लोक्संख्याचा संक्षिप्त आढावा दिला आहे.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| अ.क्र. | तपशील | एकूण | पुरुष | स्त्री |
|---|---|---|---|---|
| १ | एकूण लोकसंख्या | ९६८ | ५२६ | ४४२ |
| २ | बाल लोकसंख्या (०-६) वर्षे | १०३ | ५४ | ४९ |
| ३ | अनुसूचित जाती (SC) | १ | १ | – |
| ४ | अनुसूचित जमाती (ST) | ९६६ | ५२३ | ४४२ |
| ५ | साक्षर लोकसंख्या | ६९० | ४१४ | २७६ |
| ६ | निरक्षर लोकसंख्या | २७८ | ११२ | १६६ |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |